कोणी म्हणे डुकराचे डिमांड वाढले आहे,
सर्वांच्या तोंडी त्याचेच नाव आहे.
हाच का स्वाइन फ्लू आहे?
प्रधान मंत्रीची झोप उडाली आहे,
स्वास्थ मंत्री चे विचार करून स्वास्थ खराब झाले आहे
सामान्य माणसाचे तोंडाला MASK लावून दमछाक झाली आहे.
हाच का स्वाइन फ्लू आहे?
आज भारत हि नकाशावर नाव गाजवत आहे,
कारण अमेरिकेचा रोग भारतात पाय पसरू लागला आहे,
हाच का स्वाइन फ्लू आहे?
बस -ट्रेन मध्ये त्याच्याच गप्पा आहेत,
निर्दोष असूनही लोक आतंकवादी असल्या सारखे रुमाल तोंडाला लावून देश भर फिरत आहेत.
face recognition सोडून लोक voice recognition वर भर देत आहेत.
हाच का स्वाइन फ्लू आहे?
डेनिम जीन्स च्या किमती जमिनीवर आल्या आहेत,
मास्कच्या किमती आकाशाकडे उंच मानेने पाहत आहेत .
सामान्य जनतेचा श्वास ह्याच मास्क मध्ये दाबला जात आहे,
हाच का स्वाइन फ्लू आहे?
Private दवाखान्यात टेस्ट करायची किंमत 10,000 आहे,
जिकडे फुकट आहे तिकडे लाईन भरपूर आहे,
patient डॉक्टरला देवा -सारखा पाहत आहे,
आणि डॉक्टर भीतीपोटी patient ला यमदुता सारखा घाबरत आहे.
अरे परमेश्वरा हाच का स्वाइन फ्लू आहे? ...हाच का स्वाइन फ्लू आहे?